बुद्धिप्रामाण्यवाद
बुद्धिप्रामाण्यवादाचा आवेशाने प्रचार करण्याची उत्कट आवश्यकता अनेकांना जी भासते, तिचे कारण काय? अनेकजण बुद्धिप्रामाण्यवादाचा प्रसार करणे हे आपले जीवितकार्य आहे असे मानताना आढळतात. बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे तरी काय? बुद्धिप्रामाण्यवादाचे जे एक स्पष्टीकरण अनेकदा देण्यात येते ते असे की, “आपल्या बुद्धीला जे सत्य किंवा योग्य म्हणून पटते, ते आणि तेच सत्य किंवा योग्य म्हणून स्वीकारावे; आपल्या बुद्धीला …